शुक्रवार ५ ऑक्टोबर २०१२

विलासराव देशमुख यांचे सामाजिक मूल्यमापन

त्याच मित्राचा अजून एक लेख. विलासराव देशमुखांवर.-@Heramb Oak

------------------------------------------------------------------------------

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा प्रवक्ता नाही किंवा अमानवी प्रवृत्तीचा नाही हे आधी स्पष्ट केले पाहिजे .

मृत्यू एखाद्याचे जीवन संपवतो त्यामुळे तो वाईट असतोच .पण केवळ मृत्यू झाला म्हणून एखादा माणूस महापुरुष,युगपुरुष ठरू शकत नाही .

विलासराव देशमुख यांच्
या बाबतीत हे तंतोतंत लागू होते .त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करणे गैर नाही पण त्यांना आशा उपाध्या लावणे हे भाबडे पणाचे आहे .माध्यमांना काही औचित्य ,संकेत बाळगावे लागतात पण तशी अपरिहार्यता सामान्य माणसास नसते .

उमेदीची काही वर्षे सोडली तर विलासराव देशमुख यांनी घटनेची पायमल्ली करणे ,कायदा धाब्यावर बसवणे ,लोकशाहीची खिल्ली उडवणे आणि सामान्यांच्या प्रश्नांची क्रूर थट्टा करणे या पलीकडे काही केले नाही .

विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारमधील जवळपास सर्व मंत्रीपदे,कालावधीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद सांभाळली .पण या त्यांच्या कालावधीतील केवळ ५ धोरणात्मक आणि पुरोगामी निर्णय विचारले ज्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला..तर त्याचे उत्तर शून्य असे द्यावे लागेल .या उलट ५ भ्रष्टाचाराची प्रकरणे सांगा म्हणलं तर सहज सांगता येतील .

विलासराव देशमुख यांनी एक वेगळाच ‘आदर्श’ घालून दिलेला आहे आणि तो घातक आहे .

मुख्यमंत्र्याचे काम सर्व खात्यांवर देखरेख ठेवणे,महसुली उत्पन्न वाढवणे,जनहिताचे निर्णय घेणे आणि ते राबवणे ,कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेणे हे असते .परंतु विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एफ.एस.आय वाढवणे,मोकळे भूखंड बिल्डर्स च्या घशात घालणे आणि काँग्रेस पक्षासाठी आणि स्वतःसाठी मलिदा कमावणे हे काम निष्ठेने केले.नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याने त्याची सर्व जबाबदारी ही विलासराव देशमुख यांची होती.त्या बदल्यात बिल्डर्स नी मुंबई,पुणे नाशिक सारख्या शहरातील घर बांधणी क्षेत्रातील प्रत्येक स्क्वेअर फुट मागे ५०० रुपये या यंत्रणेस दिले .त्यातील २०० रुपये काँग्रेस च्या निवडणूक फंडात ,२०० रुपये सोनिया गांधीच्या स्विस खात्यात आणि १०० रुपये विलासराव देशमुख च्या स्विस खात्यात गेले .हिरानंदानी बिल्डर ने पवई येथे सर्व सामान्यांसाठी स्वस्तात लहान घरे बांधण्याचा प्रस्ताव देऊन तो मान्य करून घेऊन प्रत्यक्षात धन दांड्ग्यांसाठी मोठी घरे बांधली आणि हे विकास आराखडे मंजूर होत असताना ,अवैध बांधकाम होत असताना नगर विकास खाते शांत बसून होते .मा.उच्च न्यायालयाने या संदर्भात अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत.

फंड रेझिंग मध्ये निष्णात असल्या कारणाने काँग्रेस ने ही विलासराव देशमुख ची नेहमी पाठराखण केली .

आदर्श ला नियमबाह्य परवानगी देणे,रस्ता रुंदी बाबतचा नगर विकास सचिवांचा शेरा रद्द करणे ,सी .आर.झेड. नियम उल्लंघन करणे हे सर्व निर्णय विलासराव देशमुख यांनी तत्परतेने घेतले आणि असे करताना शहिदांच्या वारसानसाठी असलेल्या जागेचा आपण गैरवापर करत आहोत,राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणत आहोत याचे देखील नैतिक भान राखले नाही .

मालाड ,वर्सोव्या जवळील अनाथ,अंध मुलींच्या वसतीगृहासाठी राखीव असलेला भूखंड ,त्याचे आरक्षण बदलून स्वतःच्याच ‘मांजरा च्यारीटेबल ट्रस्ट’ (या ट्रस्ट ची नोंदणी देखील अवैध असल्याचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला आहे ) ला कवडी मोल दराने (५३ रुपये पर स्क्वेअर फुट <मुंबई मध्ये >) देणे आणि तेथे धन दांड्ग्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारणे हे यांचे समाजकार्य.

आपल्या मुलाला फिल्म देण्याच्या बदल्यात चित्र नगरीतील भूखंड सुभाष घई ला नियम डावलून देणे हे यांचे सांस्कृतिक कार्य .

दिलीप सानंदा या उद्दाम आमदार कम सावकाराच्या सावाकारीने नाडलेल्या ,खंगलेल्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा बायको पोलिसात तक्रार देत असता आणि कर्तव्यदक्ष अधिकारी ती नोंदवून घेत असता ..थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ती तक्रार नोंदवून न घेण्याचा आदेश देणे हा यांचा शेतकर्‍याबाबतचा कळवळा..!

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘राजधर्माचे पालन केले नाही ‘ असे कडक ताशेरे ओढून दंड म्हणून १०,००,००० रुपये महाराष्ट्र सरकारला भरायला लावले आणि सरकारने ते जनतेच्या खिशातून भरले.

या सर्व संदर्भात विलासराव देशमुख यांना प्रतिक्रिया विचारली असता चेहऱ्यावरचा मिश्कील पणा किंचीत कमी होऊ न देता “माणूस चुका करतो ..चुका करून माणूस शिकतो “ असे उत्तर देणारे हे गेंड्याच्या कातडीचे तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री !

पश्चिम.महाराष्ट्रातून सहकार हद्दपार आणि नामशेष करण्याचे काम शरद पवार यांनी जातीने केले .तेच काम विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यात (निष्ठेने) केले.

कापूस एकाधिकार योजनेचे तीन तेरा वाजले .मुख्यमंत्री मराठवाड्याचा असून ही त्याचा अनुशेष कधिही भरून निघाला नाही .सिंचनात वाढ झाली नाही .

बोगस नोंदणी झालेले सर्वाधिक मजूर मराठवाड्यात निघाले आणि रोजगार हमी योजनेची पूर्ण वाट लावण्याचे काम विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत झाले .

आघाडी चे सरकार आणि महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती हे मान्य केले तरी सहकार खाते प्रथम पासून काँग्रेस कडे होते . विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत सहकारी पतपुरवठयाच्या यंत्रणेचे तीन तेरा वाजले,राष्ट्रवादीने सहकारी ब्यांका लुबाडणे आधीच चालू केले होते ,त्यात त्रिस्तरीय पतरचना कोलमडून पडली आणि सावकारी फोफावली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाली ,पुन्हा या ब्यांकानी दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडला .या वेळी रिझर्व ब्यांकेने वेलो वेळी दिलेले इशारे केराच्या टोपलीत टाकले गेले .

पूर्वी लातूर प्याटर्न नावाचा शैक्षणिक प्रकार १९९५ ते १९९९ मध्ये जोरात होता .यात ९ वी तील मुलांना मे महिन्यात १-२ आठवडे सुट्टी देऊन १० वी चा अभ्यास सुरु केला जात असे .या प्याटर्न मधून अनेक मुले लातूर परिसरातून मेरीट मध्ये आली .हा प्याटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांनी राबवला होता . विलासराव देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांचे खच्ची करण करणे ,निधी अडवणे आणि आपल्या टिल्लू-पिल्लुंच्या खासगी महागड्या इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचे धोरण अवलंबले आणि ते राबवले (हे धोरण आता महाराष्ट्रात सर्वत्र राबवले जात आहे ).त्या मुळे शिक्षणाचा दर्जा अमुलाग्र घसरला .

सामान्य प्रशासन विभाग थेट मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतो .सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत

विलासराव देशमुख यांनी सरसकट कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साईड पोस्टींग ला टाकण्याचे आणि मर्जीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवाजेष्टता डावलून महत्वाच्या पदावर नेमले .चंद्रशेखर यांसारखे अधिकारी याच काळात सरकारी नोकरी ला राम राम करून निघून गेले .या मुळे धोरणात्मक पातळीवर गोंधळ होताच पण प्रशासन सुस्त आणि अकार्यक्षम झाल्याने अंमलबजावणी चा ही बोजवारा उडाला .

कृपाशंकरसिंह सारख्या व्यक्ती मोठ्या झाल्या त्या विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत . कृपाशंकरसिंह यांचे काम इतकेच की विलासराव देशमुख कुठल्याही ठिकाणी गेले की तेथे “विलासराव देशमुख की जय “ असे म्हणणारी आणि हारतुरे घालणारी ,फटाके वाजवणारी ५० माणसे तयार ठेवणे.गृहराज्य मंत्रीपद देण्या पर्यंत या माणसाची मजल गेली .

२६/११ ची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने विलासराव देशमुख यांची होते.आपल्या ४-४ वर्षाच्या २ टर्म मध्ये एकदाही वरिष्ठ पोलीस अधिकारी,गुप्त वार्ता विभाग आणि गृह विभाग यांची संयुक्त बैठक घेतली गेली नाही .माणसे मेली,पोलीस मेले आणि कसलीही चाड न बाळगता हे रितेश देशमुख (याची काही मोठा अभिनेता असल्याची ख्याती नाही ) आणि राम गोपाल वर्मा ला घेऊन “शुटिंग” लोकेशन बघायला गेले .शेवटी हाय कमांड ने सांगितल्यावर राजीनामा दिला ..पण चेहऱ्यावर निर्लज्जपणा तसाच ठेवून .

पुढे फंड रेझिंग ची आणि शरद पवार यांना शह देण्याची क्षमता लक्षात घेवून काँग्रेस ने त्यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले .विधिमंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाशवी बहुमतामुळे त्यांचा विजय निश्चित होता ..पण शिवसेना-भाजपा ने ऐनवेळी उमेदवार मागे घेऊन अशा माणसाची बिनविरोध निवड होऊ दिली .केंद्रात अवजड उद्योग खात्यचा भार स्वीकारताना हा माणूस ‘व्ही’ अशी खूण करत “माझे कोणी काही उपटू शकत नाही “ आशा आविर्भावात जनतेला समोरा गेला.

मराठवाडा मराठेशाहीचा भाग कधीच होऊ शकला नाही याचे कारण यांच्या पूर्वजांनी देखील स्वधर्म,स्वभाषा,स्वदेश यांना महत्व न देता आपली देशमुखी टिकवण्यात धन्यता मानली .

बॉम्बस्फोट होवोत,अतिरेकी हमले होवोत ,राज्यात दुष्काळ पडो,विजेची अभूतपूर्व टंचाई निर्माण होवो,शेतकरी आत्महत्या करोत,सामान्य माणूस रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करो ..म्हणजेच काहीही होवो पण चेहऱ्यावरची स्मितहास्य रेषा ढळू न देणे..कोणत्याही प्रश्नाला हसण्यावारी नेणे किंवा सोडवायचा प्रयत्न करतो असे दाखवत तो टोलावणे आणि पूर्णपणे विधिनिषेध शून्यता बाळगणे हे विलासराव देशमुख यांच्या स्वभावाचे आणि कारकीर्दीचे व्यवछेदक् लक्षण म्हणावे लागेल !

त्यांच्या कडे उमदेपणा,दिलखुलासपणा,दिलदार पणा असेल पण सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीची समाजाप्रती असलेली बांधिलकी,निष्ठा,कर्तव्यदक्षता,
जबाबदारीचे भान इ.गुणांच्या संदर्भात त्यांच्या इतर गुणांचा उल्लेख आणि आदर करणे क्रमप्राप्त ठरते .

विलासराव देशमुख यांचे सामाजिक मूल्यमापन करता जमा शून्य असल्याचे खेदाने म्हणावे लागेल .

अशा माणसासाठी ज्याने ज्या मूल्यांवर आधुनिक भारताची उभारणी झाली त्या मुल्यांचा ऱ्हास केला त्या माणसा साठी तिरंगा अर्ध्यावर फडकावा,सरकारी इतमाम आणि बंदुकीच्या फैरी झडाव्या हे या देशाचे दुर्दैव आहे .

पण हे दुर्दैव येथेच थांबणार नाही ..व्यक्ती पूजेचे स्तोम माजलेल्या या देशात विलासराव देशमुख यांची पोकळी लवकरच भरून निघेल ..हे या देशाचे अधिक मोठे दुर्दैव आहे !

जय हिंद !
जय महाराष्ट्र !

कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही ..तसे झाल्यास क्ष
मस्व !

3 टिप्पण्या:

devdesh म्हणाले...

लेख छानच झाला आहे. मात्र लेखाच्या शेवटी जी क्षमा मागितली आहे, ती कशासाठी? भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. आहे ती वस्तुस्थिती आहे.

mynac म्हणाले...

"मृत्यू एखाद्याचे जीवन संपवतो त्यामुळे तो वाईट असतोच .पण केवळ मृत्यू झाला म्हणून एखादा माणूस महापुरुष,युगपुरुष ठरू शकत नाही " हि वास्तवता असते तथापि एकूणच सर्व क्षेत्रांचा (भ्रष्टाचार वगळता)घसरलेला दर्जा पाहता,नि सामान्य माणूस दैनंदिन जिणे जगता-जगता इतका व्यस्त नि बधीर झालेला आहे कि त्यातील विवेकशून्यता सर्वस्वी लयास पोहोचली आहे.गेली ६० वर्ष या देशातील सर्व सामान्य माणूस फक्त दोन वेळेला हातातोंडाची गाठ घालण्यातच इतका व्यग्र आहे,नव्हे त्याला तसे जाणीवपूर्वक ठेवले गेले आहे कि,त्या मुळे तो/ती नि त्याचे कुटुंब ह्याच्या पलीकडे जाऊन कोणताही विचार करण्याची त्याची पत्रातच तो हरवून बसला आहे.ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे चारचौघे एखाद्यास बरे किंवा वाईट संबोधू लागले कि त्या कळपात बहुमताच्या बाजूला स्वतःला झोकून देणे,त्या प्रवाहात वहात जाणे ह्या पलीकडे तो काही करत नाही.त्या मुळे विलासरावांची अंत्ययात्रा नि त्या नंतरचा टि.व्ही वरील दंग्याच्या महापुरात सर्वसामन्य माणसाची उरली सुरली विचारशक्ती सुद्धा वाहून न गेल्यासच आश्चर्य म्हणायचे.

Ram म्हणाले...

Absolutely true. After his death, every city had banners about his non existent greatness. His contribution for Maharashtra is nearly zero. Nothing near Yashwantrao Chavan or Sharadrao Pawar in that reference. Even for Latur he has done little. The road from Nanded to Latur is very pathetic. Except Latur city all the district is very backward.
Congrats for writing the truth.